‘गोष्टींची गोष्ट’ने पटकावला राजा नातू करंडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोष्टींची गोष्ट’ने पटकावला राजा नातू करंडक
‘गोष्टींची गोष्ट’ने पटकावला राजा नातू करंडक

‘गोष्टींची गोष्ट’ने पटकावला राजा नातू करंडक

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेत आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजेच्या संघाने सादर केलेल्या ‘गोष्टींची गोष्ट’ या नाटकाने विजेतेपद पटकावले. तर, आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीच्या ‘बळी’ला द्वितीय क्रमांकासाठीचा शरद तळवलकर करंडक जाहीर झाला.
झिल एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूलच्या ‘आकार’ला तृतीय क्रमांकासाठीचा संजीवन करंडक मिळाला. कल्पक सादरीकरणासाठी नू. म. वि. मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘दर्पण’ नाटिकेस मथुरा माई करंडक जाहीर करण्यात आला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासकने प्राथमिक गटातील नाटिका स्पर्धा ते पुरुषोत्तम करंडक या दोन स्पर्धांमधील दुवा साधला जावा, या उद्देशाने यंदाच्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ‘राजा नातू करंडक’ नाटिका स्पर्धा सुरू केली आहे. भरत नाट्य मंदिरात यंदाची स्पर्धा पार पडली. त्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत एकूण २३ शाळांचे संघ सहभागी झाले होते..
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी श्याम जोशी असणार आहेत. ‘गोष्टीची गोष्ट’ आणि ‘दर्पण’ या नाटिकांचे सादरीकरण या वेळी होणार आहे.

सविस्तर निकाल
-सर्वोत्कृष्ट लेखक : श्वेता देशमुख, सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल
-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अमृता जोगदेव, आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजे
-सर्वोत्कृष्ट अभिनय : अनुष्का गोसावी, आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी
-सर्वोत्तम अभिनय (विद्यार्थी) : कृष्णकांत बहिरट, मॉर्डन हायस्कूल मुलांचे, शिवाजीनगर
-सर्वोत्तम अभिनय (विद्यार्थिनी) : मधुजा मिठभाकरे, आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजे
-सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय : इशिता केळकर, झिल एज्युकेशन सोसायटीचे सिल्व्हर क्रेस्ट स्कूल