Sun, April 2, 2023

सनदी लेखापालाला खंडणी मागणाऱ्यास अटक
सनदी लेखापालाला खंडणी मागणाऱ्यास अटक
Published on : 30 January 2023, 6:53 am
पुणे, ता. ३० : चार्टर्ड अकाउंटंटला मोबाईल व्हॉटसॅअपवर कॉल करून ३० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
किरण रामदास बिरादार (वय २४, रा. उदगीर, सध्या पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
या संदर्भात एका चार्टर्ड अकाउंटंटने तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, बनावट नोटा व रोख नोटा, बॅग असा १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.