कार्बन न्यूट्रलसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्बन न्यूट्रलसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत
कार्बन न्यूट्रलसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत

कार्बन न्यूट्रलसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ‘‘कार्बन न्यूट्रल पुण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. त्यासाठी सक्ती करण्याची वेळ येता कामा नये. जागृती घडवून स्वयंप्रेरणेने हे काम झाले पाहिजे,’’ असे मत ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज’चे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी व्यक्त केले.

‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग ॲण्ड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स’च्या वतीने ‘सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ’ विषयावर ग्रीन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी ही कॉन्क्लेव्ह झाली. त्यात गिरबाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्याची क्षितिजे उंचावणाऱ्या इमारतींच्या बांधकामामुळे शाश्वत विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली. आर्किटेक्ट, सल्लागार, अभियंते, नागरिक प्रतिनिधी असे ३०० जण या परिषदेत सहभागी होते. या एक दिवसीय कॉन्क्लेव्हमध्ये पंकज धारकर, एन. एस. चंद्रशेखर, आनंद चोरडिया, चेतन सिंग सोळंकी उपस्थित होते. डॉ केरी चॅन, केन यिंग, डॉ. हरिहरन, मिली मुजुमदार, अनुजा सावंत, अबीर भल्ला, पंकज धारकर, अरविंद सुरंगे यांनी मार्गदर्शन केले. ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
 
चंद्रशेखर म्हणाले, ‘‘लोकसंख्या, शहरांप्रमाणे रिएल इस्टेट मार्केट वाढत आहे. ३० टक्के जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा आहे. कार्बन उत्सर्जनदेखील वाढत आहे. वीजेचा वापर कमी केला पाहिजे. आपल्या इमारतीमुळे परिसंस्थेवर परिणाम होऊ देता कामा नये.’’ सानिका पागे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग ॲण्ड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स’च्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे, कॉन्क्लेव्हच्या निमंत्रक अंशुल गुजराथी, कर्नल सुनील नरूला यांनी स्वागत केले. 

या मान्यवरांचा गौरव
आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा या वेळी विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आनंद चोरडिया (अर्थ अवॉर्ड), सुभाष देशपांडे (वॉटर अवॉर्ड), पंकज धारकर (फायर अवॉर्ड), एन. एस. चंद्रशेखर (विंड अवॉर्ड), विश्वास कुलकर्णी (स्पेस अवॉर्ड), प्रदीप भार्गव (इलेमंट ऑफ सस्टेनेबिलिटी अवॉर्ड), चेतन सोळंकी (एलेमेंट ऑफ एनर्जी), शीतल भिलकर (वूमन आयकॉन अवॉर्ड) यांचा त्यात समावेश आहे.