Tue, March 21, 2023

रास्ता पेठेतील तीन दुकानांमध्ये चोरी
रास्ता पेठेतील तीन दुकानांमध्ये चोरी
Published on : 12 February 2023, 1:49 am
पुणे, ता. १२ : रास्ता पेठ परिसरातील तीन होलसेल दुकानामध्ये चोरी करून चोरट्यांनी एक लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ते ११ फेब्रुवारीदरम्यान माळी महाराज मठ रस्ता परिसरातील गणक एन एक्समध्ये घडली.
फिर्यादी यांचे एनएक्स नावाने प्रोव्हिजन स्टोरअचे दुकान आहे. १० ते ११ फेब्रुवारीला दुकान बंद असताना चोरट्यांनी एक लाख ७४ हजारांची रोकड चोरून नेली. त्याशिवाय किशोर खीमशेरा यांच्या सॅनिटरी वेअरच्या दुकानातून एक हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर महेंद्र माळी यांच्या आइस्क्रीम दुकानातून सहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. तीनही दुकानांतून चोरट्याने एक लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.