एरो इंडियामध्ये अमेरिकेच्या आणखी दोन विमानांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एरो इंडियामध्ये अमेरिकेच्या 
आणखी दोन विमानांचा समावेश
एरो इंडियामध्ये अमेरिकेच्या आणखी दोन विमानांचा समावेश

एरो इंडियामध्ये अमेरिकेच्या आणखी दोन विमानांचा समावेश

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : अमेरिकेचे पाचव्या पिढीतील सर्वात नवीन आणि शक्तिशाली ‘एफ-३५-ए’ या लढाऊ विमानांनी एरो इंडियामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले असताच मंगळवारी अमेरिकेने आपल्या आणखीन दोन जेट विमानांना यलहांका एअर फोर्स स्टेशनच्या धावपट्टीवर उतरवत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अमेरिकेच्या दोन बी-१बी लांसर सुपरसोनिक बाॅम्बर जेटदेखील आता एरो इंडियाचा भाग राहणार आहे. एरो इंडियामध्ये दुसऱ्यांदा या विमानाचा सहभाग झाला आहे.
या विमानात शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पारंपारिक पेलोड घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हवाई दलामध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे. या विमानाला ‘बोन’ या नावाने ही संबोधले जाते. जगभरातील विविध देश एरो इंडियामध्ये सहभागी झाले असून अमेरिकेन वायुदलाने त्यांची नवीन पिढितील दोन सुपरसोनिक विमाने एरो इंडियात दाखल करून त्यांचे हवाई संरक्षण सामर्थ्य प्रदर्शित केले आहे. दरम्यान, या माध्यामातून भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. एफ- ३५, एफ- १६ या विमानाद्वारे एरो इंडिया दरम्यान दररोज हवाई प्रात्यक्षिके होत असून अमेरिकेच्या नौदलाचे एफए-१८ हॉर्नेट विमानदेखील पाहायला मिळत आहे.

महिला पायलटने केले उड्डाण
एरो इंडियामध्ये होत असलेल्या विमानांच्या कवायतींमध्ये ‘एफ-३५ ए’चा ही समावेश आहे. हे विमान सध्या या कार्यक्रमाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दरम्यान मंगळवारी प्रात्यक्षिके सादर करताना या विमानाचे सारथ्य अमेरिकेच्या हवाई दलातील महिला पायलटने केले.

मी पहिल्यांदा भारतात आलो आहे, ते ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने. गेल्या काही दशकांत भारताच्या सशस्त्र दलांसोबत विविध युद्ध अभ्यास करण्यात येत आहेत. मात्र, एरो इंडिया सारख्या उपक्रमातून अमेरिकेला आपल्या विमानांची क्षमता प्रदर्शित करण्याची संधी मिळत आहे. यामुळे दोन्ही देशातील सशस्त्र दलांमध्ये समन्वय वाढेल.
- आरोन लिपिटी, लेफ्टनंट, नौदल, अमेरिका