Tue, March 28, 2023

पर्यटन परिषदेसाठी गायकवाड यांची निवड
पर्यटन परिषदेसाठी गायकवाड यांची निवड
Published on : 7 March 2023, 12:09 pm
पुणे : जर्मनीतील बर्लिन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेसाठी सावरकर अभिवादन यात्रेचे प्रणेते कॅप्टन नीलेश गायकवाड यांची निवड झाली आहे. बर्लिनमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन (एमटीडीसी) च्या वतीने त्यांना तसे अधिकृत पत्रही देण्यात आलेले आहे. बर्लिनमध्ये दरवर्षी ही परिषद होते. यात जगभरातील विविध राष्ट्रांचे, त्यातल्या राज्यांचे नामांकित पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. परिषदेमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी विविध परिसंवाद, चर्चासत्रे आणि सादरीकरणाचे आयोजन केले जाते. कॅप्टन गायकवाड हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.