सारसबागेत नागरिकांचे डबे तपासण्याचे आदेश

सारसबागेत नागरिकांचे डबे तपासण्याचे आदेश

पुणे, ता. २२ : बासी ईदनिमित्त मुस्लिम बांधव डबे घेऊन उद्यानांमध्ये जेवणासाठी येतात. मात्र, सारसबागेत गणपतीचे मंदिर असल्याने येथे मांसाहार करू नये, यासाठी गेटवरच त्यांना आडवून त्यांचे डबे तपासावेत, असे आदेश पोलिस प्रशासनाने दिला आहेत. यासाठी रविवारी (ता. २३) तब्बल दीडशे पोलिस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा येथे तैनात असेल.

देशभरात शनिवारी रमजान ईद उत्साहाने साजरी झाली. ईदच्या दुसऱ्या दिवशी बासी ईद साजरी केली जाते. या वेळी मुस्लिम बांधवांकडून घरून डबे घेऊन येऊन उद्यानांमध्ये जेवतात. दरवर्षी अशीच प्रथा असते. मात्र, सारसबागेत पेशवेकालीन गणपती मंदिर असल्याने तेथे मांसाहारावर बंदी आहे. तसेच उद्यानात मांसाहार करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी काही संघटनांनी पोलिसांकडे केलेली होती.

संघटनांचा विरोध पाहता उद्यानाच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच उद्यान परिसरात साध्या वेशातील पोलिस लक्ष ठेवून असतील. पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी या संदर्भात पुणे महापालिकेला माहिती दिली आहे. मात्र, हे सर्व डबे तपासण्याचे नियोजन व मांसाहार आतमध्ये घेऊन जाण्यास प्रतिबंध घालण्याची पूर्ण जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे, महापालिकेवर नाही असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

पोलिसांकडून या संदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेला माहिती देण्यात आलेली आहे. डबे तपासणी ही पोलिसांकडून केली जाणार आहे महापालिकडून नाही.
- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग

सारसबाग गणपती मंदिर असल्यामुळे दरवर्षी ही खबरदारी घेतली जाते, येथे मांसाहार करण्यास बंदी आहे. यावर्षी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. काही नागरिक जेवणाचे डबे घेऊन येतात. त्यात मांसाहार असतो, अशी तक्रार काही संघटनांनी केली होती. त्यामुळे आम्ही उद्या सारसबाग येथे १५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. महापालिकेला ही मनुष्यबळ देण्यास सांगितले आहे. सारसबाग येथे येणाऱ्या नागरिकांकडे डबे आहेत का, याची तपासणी केली जाईल, डबे नसणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
- अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com