Tue, October 3, 2023

अशोक विद्यालयाचा
शंभर टक्के निकाल
अशोक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
Published on : 29 May 2023, 12:04 pm
पुणे, ता. २९ : महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परिक्षेत शंभर टक्के निकाल लागला. कला, वाणिज्य व विज्ञान या तीन शाखांतून ३७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विज्ञान शाखेत हर्षाली कुंजीर (८९.५० टक्के), श्रेय सराफ (८८.६७) व अरुंधती तावरे (८७.८३) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. मंडळाचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----