‘झेडपी’ सेवेत ग्रामपंचायत कर्मचारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘झेडपी’ सेवेत ग्रामपंचायत कर्मचारी!
‘झेडपी’ सेवेत ग्रामपंचायत कर्मचारी!

‘झेडपी’ सेवेत ग्रामपंचायत कर्मचारी!

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : पुणे जिल्हा परिषदेतील एकूण रिक्त पदांपैकी दहा टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९० पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे. यानुसार सरळ सेवा भरती प्रक्रियेत ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक वर्योमर्यादेत दोन वर्षांची सूट दिली जाणार आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील मिळून क वर्गातील विविध पदांच्या ८९९ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. ही नोकर भरती प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद पातळीवर केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची कर्मचारी भरती मागील दहा वर्षांपासून रखडली होती. यंदा ही कर्मचारी भरती केली जाणार आहे. या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांनी संवर्गनिहाय हा अभ्यासक्रम निश्चित केला असून, याला ग्रामविकास खात्याने मंजुरी दिली आहे.
२०१६ पासून आतापर्यंत एकदाही पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती झालेली नाही. पूर्वी दरवर्षी जुलै महिन्यात जिल्हा परिषद पातळीवरच ही भरती प्रक्रिया सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने याआधी महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु केली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने ऑक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या.

भरली जाणारी पदे
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेवक
- औषध निर्माण अधिकारी
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- कंत्राटी ग्रामसेवक
- कनिष्ठ अभियंता
- कनिष्ठ लेखाधिकारी
- वरिष्ठ सहायक
- कनिष्ठ सहायक
- विस्तार अधिकारी