रविवार आत्म्याला शांती देण्याचा दिवस

रविवार आत्म्याला शांती देण्याचा दिवस

पुणे : उपनिषदातील श्लोकांमध्ये आत्म्याची जोड देत रविवारच्या महत्त्वाबाबत विशेष वर्णन केले आहे. रवी म्हणजे सूर्य. सूर्याचा वार म्हणजे रविवार. या दिवशी सूर्याचे तेज प्राप्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे दैनंदिन कामातून मुक्त होत रविवारी आत्म्याला शांती देण्याची गरज असल्याचे संस्कृत व वैदिक जपतज्ज्ञ गैय्या संस्कृत यांनी आवर्जून नमूद केले.
मूळ ब्रिटनच्या असलेल्या गैय्या संस्कृत यांनी ‘स्वास्थ्यम्’मध्ये तिसऱ्या दिवशी संस्कृत भाषेतील श्लोकांच्या उच्चारातून श्रोत्यांना वातावरणात दंग केले. ‘राम कृष्ण हरी’ असा त्यांच्या उद््बोधनाचा विषय होता. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ या श्लोकाने त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या सादरीकरणाला संगीताचीदेखील उत्तम साथ लाभली. गैय्या यांनी स्वतः गिटार हाती घेत संगीतात एकरूप होत श्लोकांचा उच्चार केला. सोबतीला पखवाज वाद्यावर निखिल घोरपडकर यांनी आणि कीबोर्डवर सौरभ गोडबोले यांची त्यांना साथ दिली.
गैय्या यांनी पुढे गायिलेल्या ‘अखंड मंडलाकारं’, ‘तपत-कांचन गौरांगी’ आदी श्लोकांमधून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रसिक श्रोत्यांना त्यांनी ‘स्व’शी जोडत आत्म्याशी सांगड घातली. गायत्री मंत्राने वातावरण अधिक चैतन्यमय झाले. राम नामाने त्यांनी सांगता कार्यक्रमाची केली.

श्रोते एकरूप
- पुणेकर श्रोत्यांनी मिळविले श्लोकांच्या शब्दाला शब्द
- संगीताच्या ठेक्याला ठेका देत गैय्या यांना उत्तम साथ
- श्लोकातील प्रत्येक शब्दाच्या महत्त्वाची जाण ठेवत श्रोते एकरूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com