आमदार सुनील कांबळे 
यांच्या निषेधार्थ आंदोलन

आमदार सुनील कांबळे यांच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे, ता. ६ : कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने (शरद पवार गट) शनिवारी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. ससून रुग्णालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

ससून रुग्णालयातील विविध विकास कामांचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ससून रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी रवींद्र माळवदकर, कणव चव्हाण, शेखर धावडे, नितीन पाटोळे, मीना पवार, अजिंक्य पालकर, सुवर्णा माने, मृणाल वाणी, रूपाली शिंदे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, ‘‘आमदार सुनील कांबळे यांनी केलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलाचा अपमान झाला आहे. कायदा करणारेच कायदा मोडत असतील तर जगापुढे आपण आपली काय प्रतिमा तयार करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने आमदार सुनील कांबळे यांना तातडीने पदमुक्त करावे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षाच्या आमदाराचा राजीनामा घेता येत नसेल तर त्यांनी स्वतः गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com