भारत-म्यानमार सीमेवर 
आसाम रायफल्सची कारवाई

भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सची कारवाई

बागडोग्रा (सिलिगुडी), ता. २९ : नागालँडमध्ये भारत-म्यानमार सीमेवर भारतीय सैन्यदलाच्या आसाम रायफल्सने मोठी कारवाई केली. यामध्ये आसाम रायफल्सने नागालँडच्या मोन जिल्ह्यात सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांसारखी युद्धजन्य सामग्री जप्त केली आहे. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
या कारवाईला पहाटे सुरूवात करण्यात आली होती व त्याचदरम्यान एका व्यक्तीला अटक केली. तसेच युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या १५ ट्यूब, १० पिस्तूल, १९८ रेडिओ सेट, एक सॅटेलाइट फोन, शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. एक केन्बो बाईक, एक मोटार आणि इतर युद्ध सामग्रीचाही यात समावेश होता.
सीमावर्ती भागातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांच्या प्रयत्नांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या कारवाईदरम्यान पकडलेल्या व्यक्तीला, त्याचबरोबर जप्त केलेला दारूगोळा, शस्त्रास्त्रे व इतर साधनसामग्रींना नागालँड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com