विजेच्या धक्क्याने महावितरणचा कर्मचारी जखमी

विजेच्या धक्क्याने महावितरणचा कर्मचारी जखमी

धनकवडी, ता. ९ : वीजपुरवठा सुरळीत करताना दुपारी महावितरणचा एक कर्मचारी विजेचा धक्का लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली. धनकवडी येथील मोहननगर भागात ही घटना घडली.
मोहननगर भागात दुपारी वीजपुरवठा खंडित होता. हा कर्मचारी म्हसोबा मंदिरासमोरील डीपीवर चढला. त्याला विजेचा धक्का लागल्याने तो तेथून खाली रस्त्यावर फेकला गेला. त्यामध्ये तो भाजला होता. काही वेळाने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. नागरिकांनी त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले. धनकवडी परिसरात दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. सहा दिवसांपूर्वी तळजाई पठार येथील सब स्टेशनयेथे झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला होता. मात्र रविवारी (ता. ९) दुपारी हा कर्मचारी डीपीवरती का चढला होता व काय करत होता? याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती.
जखमी झालेला कर्मचारी महावितरणमध्ये कंत्राटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला कोणी काम करण्याचा आदेश दिला होता का किंवा तो स्वतःहून तेथे गेला होता याबाबत अजून माहिती मिळाली नाही, असे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले.

रविवारी दुपारी मोहननगर परिसरात विजेच्या खांबावर महावितरणकडे आऊटसोर्स माध्यमातून काम करणारा एक कर्मचारी डिपीवर चढला होता. विजेचा धक्का लागल्याने तो जखमी झाला असून, त्यामध्ये तो २० ते ३० टक्क्यांपर्यंत भाजल्याचे समजत आहे. त्याला ससून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुढील माहिती घेत आहे.
-प्रभाकर पवार, सहाय्यक अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com