कात्रज, कोंढव्यामध्ये
आज पाणीपुरवठा नाही

कात्रज, कोंढव्यामध्ये आज पाणीपुरवठा नाही

Published on

पुणे, ता. ८ : कात्रज येथील महावितरणच्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. मंगळवारी (ता. ९) कात्रज, संतोष नगर, आगम मंदिर, संपूर्ण कात्रज कोंढवा रस्ता आणि बालाजी नगर या परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल. सोमवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास कात्रज येथील राजीव गांधी उपकेंद्रात शॉर्टसर्किट होऊन धूर निघाला. त्यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम लगेच सुरू करता आले नाही. विद्युत पुरवठा सुरु होईपर्यंत या भागातील पाणीपुरवठा विस्कळित असेल असे महापालिकेचे अधीक्षक अभियंता रामदास तारू यांनी सांगितले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.