गरजू मुलीसाठी ‘एएनएम’ परिचारिका प्रशिक्षण
पुणे, ता. १५ : जनसेवा फाउंडेशनतर्फे कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या सहकार्याने गरजू मुलींसाठी दोन वर्षे मुदतीचा निवासी ‘एएनएम’ परिचारिका प्रशिक्षण मोफत चालविण्यात येते. हा प्रशिक्षणवर्ग भारतीय नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त असून प्रशिक्षण कालावधीत शिक्षण, भोजन, निवास आदी आवश्यक सुविधा संस्थेमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रशिक्षणाच्या पात्रतेसाठी बारावी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा १७ ते ३५ वर्षे आहे, तसेच अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त प्रवर्गातील आणि ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना प्रवेशामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी येत्या २५ सप्टेंबरपर्यंत दहावी-बारावीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी पुरावा व फोटो आदी कागदपत्रांसह नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे पहिला मजला असलेल्या फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क करावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी केले.