कधी वसूल करणार ३४२ कोटींची पाणीपट्टी?
पुणे, ता. १६ : पुणे महापालिका हद्दीतील केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांकडे तब्बल ३४२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी प्रलंबित आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, असा प्रश्न सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना उपस्थित केला आहे.
मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारातून यासंदर्भात माहिती मिळवली आहे. कँटोन्मेंट बोर्डावर ४० कोटी, गॅरिसन इंजिनियर्सवर ५० कोटी, रेल्वेकडे ४५ कोटी, ससून रुग्णालयाकडे ८ कोटी तर येरवडा जेलकडे ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पोस्ट, बीएसएनएलसह केंद्र सरकारची विविध आस्थापने आणि जलसंपदा, पोलिस, शिक्षण खात्यासारखी राज्य सरकारची कार्यालये लाखो रुपयांची थकबाकीदार असल्याचे उघड झाले आहे.
सरकारी व निमसरकारी आस्थापनांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. गरज पडल्यास पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी कँटोन्मेंट बोर्डाचा पाणीपुरवठा बंद करून थकबाकी वसूल केली होती, त्याच धर्तीवर वसुलीची कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेचे पाणी प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘शासकीय कार्यालयांनी थकीत पाणीपट्टी भरावी यासाठी यापूर्वी दोन-तीन वेळा बैठक झालेली आहे, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. शासकीय कार्यालयांमध्ये बसवलेले अनेक पाणी मीटर खराब झालेले आहेत. महापालिका ते मीटर बदलून देईल आणि त्याचा खर्च पाणीपट्टीतून समायोजित केला जाऊ शकतो, पण यालाही शासकीय कार्यालयांचा प्रतिसाद नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.