पंढरपुरात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्री करणा-यावर पोलीस प्रशासनाची कारवाई ....प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्यचा ६६ हजार ६२४ रू किमतीचा मुददेमाल जप्त
पंढरपुरात ६६ हजारांचा गुटखा जप्त
पंढरपूर, ता. १५ : पंढरपूर येथील यशवंत जुमाळे ऊर्फ गवळी यांनी त्याच्या घरात विक्रीसाठी पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. शहर पोलिसांनी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व तंबाखुचा ६६ हजार ६२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी, चन्नवीर राजशेखर स्वामी, यांच्याशी संपर्क करून कायदेशीर फिर्याद देण्यात आलेली आहे. या कारवाईत रजनीगंधा पानमसाला (चार बॉक्स) ३,८४० रुपये, एम सुगंधित तंबाखू (चार बॉक्स) २४०० रुपये, बाबा नवरत्न पानमसाला (१५ टिन) ३७,५०० रुपये, विमल पानमसाला (२४ पाकिटे), २८८० रुपये, व्हि-१ सुगंधित तंबाखु (४६पाकिटे) ११८८ रुपये, विमल पानमसाला (२२ पाकिटे) ४३५६ रुपये, बी सुगंधित तंबाखू (सात किलो) ७००० रुपये, रत्ना सेंटेड तंबाखू (चार बॉक्स) ७६० रुपये, आरएमडी पानमसाला (तीन बॉक्स) २७०० रुपये, सुगंधित तंबाखु पावडर (तीन डब्बे) ३००० रुपये असा एकूण ६६ हजार ६२४ रुपये किमतीचा माल
जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

