प्रशिक्षण कायक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षण कायक्रम
प्रशिक्षण कायक्रम

प्रशिक्षण कायक्रम

sakal_logo
By

‘डेटा ॲनालिटिक्स’मधील संधींविषयी वेबिनार
पुणे, ता. २४ : ‘डेटा अनॅलिसिस’द्वारे कंपनी व उद्योग-व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्याचे मार्ग ओळखता येतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा संचयित करून खर्च कमी करण्याचे व नफा जास्त मिळवण्याचे मार्ग मिळू शकतात. चांगले व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी वापर होत असल्याने डेटा अनॅलिटीक्स आता सर्वच उद्योग-व्यवसायांमध्ये आहे आणि प्रत्येक कंपनी व संस्था डेटा अनॅलिसिस एक्सपर्टच्या शोधात आहे. या क्षेत्रातील विविध करिअर संधींविषयी अधिक माहिती देणारा विनामुल्य वेबिनार शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजता आयोजिला आहे. यामध्ये ‘रिया ऍडव्हायझरी’चे प्रिन्सिपल कन्सल्टन्ट अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३. क्यूआर कोड : PNE23T20450

डेटा सायन्सवर विनामूल्य वेबिनार
‘डेटा’ हे इंटरनेट व आयटी आधारित जगाची ओळख व वैशिष्ट्य बनले आहे. डेटावर आधारित तथ्ये, सांख्यिकीय संख्या आणि ट्रेंडच्या आधारे आजचे बिझनेस लीडर्स महत्वाचे निर्णय घेत आहेत. नव्या जगाचे हे परवलीचे तंत्रज्ञान नेमके काय आहे, डेटा सायन्स क्षेत्रातील करिअरसाठीचे मार्ग कोणते आहेत हे जाणून घेण्याची संधी वेबिनार मधून मिळणार आहे. रविवारी (ता.२९) सायंकाळी सात वाजता वेबिनार होणार आहे. वेबिनारमध्ये डेटा सायन्स आणि बिग डेटा ओव्हरव्ह्यू, डेटा सायन्समध्ये करिअर घडवण्याची आघाडीची कारणे, सध्या डेटा सायन्समध्ये करिअर सुरु करणे किती महत्वाचे आहे? यासाठीची कुठल्या कौशल्यांची आवश्यकता आहे कुठल्या नाही?, जॉब स्किल मॅपिंग आदींबाबत डोमेन व इंडस्ट्री एक्स्पर्ट असणारे अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३. क्यूआर कोड : PNE23T20451

आर्थिक उत्पन्नासाठी करा बंदीस्त शेळी-मेंढीपालन व्यवसाय
पुणे ः देशातून सुमारे ९० टक्के शेळी-मेंढीच्या मांसाची निर्यात होते. त्यामुळे ‘कमर्शिअल बंदीस्त शेळी आणि मेंढीपालन’ व्यवसायात संधीच संधी आहेत. अशा भरपूर संधी असलेल्या या व्यवसायाबाबत माहिती करून देणारी दोन दिवसीय कार्यशाळा येत्या शनिवारी (ता.२८) आणि रविवारी (ता.२९) आयोजिली आहे.यात स्वतः यशस्वी शेळी-मेंढीपालन उद्योजक या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, व्यवस्थापनात कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करणार आहे. शेळी-मेंढीचे शास्त्रोक्त संगोपन, गोठा व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र, आजार व उपाययोजना, लसीकरण, शासकीय योजना व अनुदान इ.विषयांबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी शेळी व मेंढी फार्मला शिवारफेरीचे आयोजन आहे. प्रति व्यक्ती ४५०० रुपये शुल्क आहे. आगाऊ नोंदणीसाठी ५०० रुपये सवलत ५ जणांच्या नोंदणीसाठी १००० रुपये सवलत.

कार्यशाळा : ता. २८ आणि २९ जानेवारी २०२३
ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, गेट नं.१, बाणेर रस्ता, पुणे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१