प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात पुण्यातील ३२ विद्यार्थिनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात पुण्यातील ३२ विद्यार्थिनी
प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात पुण्यातील ३२ विद्यार्थिनी

प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात पुण्यातील ३२ विद्यार्थिनी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनात नृत्य सादरीकरणाचा बहुमान पुण्यातील ३२ कथक नृत्य कलाकारांना मिळाला आहे. देशातून सात हजारांपेक्षा अधिक नृत्य कलाकारांमधून पात्र ठरलेल्या निवडक कलाकारांमध्ये त्यांनी स्थान मिळविले. प्रजासत्ताक दिनी गुरुवारी (ता. २६) पथसंचलनात या कलाकार कथक या शास्त्रीय नृत्याचे प्रतिनिधित्व करतील.
पुण्यातील टांझ कथक अकादमी, मनीषा नृत्यालय, अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक आदी नृत्यसंस्थांतील विद्यार्थिनींची निवड यात झाली. ज्येष्ठ कथक गुरू मनीषा साठे, नृत्यगुरु तेजस्विनी साठे, अमृता परांजपे, उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे यांच्या या सर्व विद्यार्थिनी आहेत. विशेष म्हणजे, गतवर्षी तेजस्विनी साठे यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून या पथसंचलनात सहभाग घेतला होता. यंदा त्यांच्या विद्यार्थिनी सहभागी होत आहेत.
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विविध मान्यवरांसमोर या कलाकार नृत्य सादरीकरण करणार आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने यातील निवडीसाठी ‘वंदे भारतम्’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची ऑनलाइन फेरी, मुंबई येथील राज्यस्तरीय फेरी, नागपूर येथील प्रादेशिक फेरी आणि दिल्ली येथील अंतिम फेरी, असे अडथळे पार करणाऱ्या कलाकारांची अंतिम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली.

नृत्य अकादमी व निवड झालेल्या विद्यार्थिनी ः
- टांझ कथक अकादमी ः सई गोखले, मृणाल वैद्य, अनुशा बावणकर, रमणी भालेराव, आर्वी बेंद्रे, ईशा रानडे, अर्पिता रोकडे, रुचा रानडे, श्रुती घोरपडे, अर्पिता भिडे.
- मनीषा नृत्यालय ः मधुरा आफळे, सहिष्णुता राजाध्यक्ष, रेवती देशपांडे, शमिका खापरे, वैष्णवी निंबाळकर, चैत्राली उत्तुरकर, कीर्ती कुरंडे, मैथिली पुंडलिक, आयुषी डोबारिया, नंदिनी कुलकर्णी.
- अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक ः अदिती फडके, मधुरा इनामदार, अपूर्वा मुळ्ये, समृद्धी लेले, साक्षी जोशी, स्वरूपा भोंदे, हिमांशी झंवर.
- उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे ः मैत्रेयी निर्गुण, समृद्धी पुजारी, अपूर्वा सोलापुरे, रेवती संत, राधिका भिंगे.

नवी दिल्ली येथे देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विविध मान्यवरांसह सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थिनी अतिशय आनंदात आहेत. या सादरीकरणासाठी त्या उत्सुक असून त्यासाठी जोरदार तयारीही करत आहेत. पुण्यातील जवळपास ३२ विद्यार्थिनींची निवड अभिमानास्पद आहे.
- पं. मनीषा साठे, ज्येष्ठ कथक गुरू