
शैक्षणिक धोरण, स्टार्टअपबाबत परिषद
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनर्इपी) अंमलबजावणी आणि अंमलबजावणीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी लाइफ एज्युकेशन युनिव्हर्सतर्फे (एलर्इयू) ‘एनर्इपी परिषद’ आणि ‘स्टार्टअप एज्युकेशन कॉन्क्लेव’ आयोजित आली आहे. सहा फेब्रुवारी रोजी कर्वेनगरमधील पंडित फार्म्समध्ये ही परिषद पार पडेल.
परिषदेत फिनलँड शिक्षण प्रणाली तज्ज्ञ प्रा. हरीश चौधरी, राज्य एनईपी टास्क फोर्स समिती सदस्य डॉ. देविदास गोल्हार, प्रा. अभय पेठे, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण तज्ज्ञ अमित चंद्रा, शिक्षण तज्ञ डॉ. स्वाती पोपट वत्स, एनर्इपी तज्ज्ञ राजेंद्र सिंग मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘लाइफ एज्युकेशन युनिव्हर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत जाधव म्हणाले, ‘‘परिषदेत स्टार्टअप इनक्युबेशन लॅब, स्टार्टअप इनोव्हेशन लॅबच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर असेल. या परिषदेला राज्यातील विविध शिक्षण संस्थांचे सुमारे तीन हजार प्राचार्य आणि विश्वस्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.’’