
हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
पुणे, ता. २४ : कर्नाटकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू संघटनांनी केली आहे.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी दशभुजा गणपतीसमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. भगवान श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे यापूर्वी प्राध्यापक के. एस. भगवान यांना अटक केली होती. पुन्हा अशी आक्षेपार्ह विधान करणार नाही, या अटीवर त्यांना जामीन मिळाला होता. परंतु, या अटीचा भंग केल्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी सरकारकडे करीत आहोत. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी दिला. या आंदोलनास प्रा. विठ्ठल जाधव, डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराचे श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.