पुष्पा तारे लिखित ‘साद’चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुष्पा तारे लिखित ‘साद’चे प्रकाशन
पुष्पा तारे लिखित ‘साद’चे प्रकाशन

पुष्पा तारे लिखित ‘साद’चे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ज्येष्ठ लेखिका आणि साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यवाह मंदा खांडगे यांच्या हस्ते पुष्पा तारे यांचा ‘साद’ हा पहिला ललित लेखसंग्रह नुकताच बाणेरच्या अथश्री येथे प्रकाशित करण्यात आला.
तारे यांनी त्यांचा लेखन प्रवास त्यांच्या मनोगतात मांडला. माधुरी देशमुख यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. पूर्वाश्रमीचे ‘कथाश्री’ या मासिकाचे ज्येष्ठ संपादक प्रकाश पानसे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्मिता अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुस्तक प्रकाशित करणे झाले सोपे अर्थात ‘एनीवन कॅन पब्लिश’ या नवीन उपक्रमाअंतर्गत सकाळ प्रकाशनाने आजवर पंधराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्याची संधी या उपक्रमाखाली देण्यात येते.