‘शिक्षकाने स्वतःमध्ये सुधारणा करावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षकाने स्वतःमध्ये सुधारणा करावी’
‘शिक्षकाने स्वतःमध्ये सुधारणा करावी’

‘शिक्षकाने स्वतःमध्ये सुधारणा करावी’

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ‘‘शिक्षकाने दररोज स्वतःमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. रोज नित्यनेमाने स्वतःमध्ये विविध सकारात्मक बदल करणे, विद्यार्थी केंद्र ठेवून त्यांचा विकास करणे हीच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शंकरराव कानिटकर गुरुजी यांना खरी आदरांजली ठरेल,’’ असे मत सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी २५ जानेवारी हा ‘कानिटकर दिवस’ म्हणून पाळला जातो. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन कानिटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, असेही त्यांनी सांगितली. संस्थेचे सचिव प्रा. श्यामकांत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी संस्थेच्या स्थापनेमागचा इतिहास त्यांनी थोडक्यात विशद केला. मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी आभार मानले. संस्थेचे उपकार्यवाह मच्छिंद्र कांबळे उपस्थित होते.