आर्थिक हितसंबंधप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष अपात्र गहुंजेतील पेबल बीच सोसायटीबाबत सहायक निबंधकांचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक हितसंबंधप्रकरणी
अध्यक्ष, उपाध्यक्ष अपात्र

गहुंजेतील पेबल बीच सोसायटीबाबत सहायक निबंधकांचा आदेश
आर्थिक हितसंबंधप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष अपात्र गहुंजेतील पेबल बीच सोसायटीबाबत सहायक निबंधकांचा आदेश

आर्थिक हितसंबंधप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष अपात्र गहुंजेतील पेबल बीच सोसायटीबाबत सहायक निबंधकांचा आदेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : गहुंजे (ता. मावळ) येथे लोढा बेलमोंडो गृहप्रकल्प आहे. त्यातील पेबल बीच सहकारी गृहरचना संस्था टॉवर-एकच्या एका सदस्याने व एका पदाधिकाऱ्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने त्यांच्यावर सोसायटीच्या माध्यमातून स्वत:चे आर्थिक हित जोपासल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्याचा आदेश मावळ सहकारी संस्था सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिला आहे.

सोसायटीच्या सदस्या शरावती पाटील व सचिव शैलेश गावंडे यांनी अध्यक्ष महेश जोंधळेकर व उपाध्यक्ष संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. परस्पर निर्णय घेणे, बदनामी करणे, ठरावाशिवाय छोट्या रकमा अदा करणे, सेवा-सुविधांचे वार्षिक देखभालीचे करार ठरावाशिवाय नूतनीकरण करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. इमारतीचा विमा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा ठराव नसताना कोटेशन मंजूर केले. त्या विम्यासाठी उपाध्यक्ष ठाकूर यांच्या पत्नी वैशाली ठाकूर यांनी कोटेशन दिले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्याबाबत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे, की संस्थेच्या आर्थिक व्यवहारांत हितसंबंध धारण केल्यास सदस्य समितीवर राहण्यास अपात्र होतो. जोंधळेकर व ठाकूर यांनी काहीही खुलासा सादर केलेला नाही. या संदर्भात त्यांनी असे म्हटले आहे की, हे पूर्वीच्या व्यवस्थापक समितीच्या कालावधीतील आहे. संस्थेच्या उपविधी ११७ नुसार, जोंधळेकर व ठाकूर अपात्र ठरत असल्याने त्यांचे व्यवस्थापन समितीचे सदस्यत्व बंद झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे. याबाबत, ‘सकाळ’शी बोलताना जोंधळेकर म्हणाले की, सहायक निबंधकांच्या निर्णयाला आम्ही सहजिल्हा उपनिबंधकांकडे आव्हान दिले आहे. त्यांचा निर्णय आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ.