बालकुमार साहित्य संमेलन नऊ फेब्रुवारीपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकुमार साहित्य संमेलन नऊ फेब्रुवारीपासून
बालकुमार साहित्य संमेलन नऊ फेब्रुवारीपासून

बालकुमार साहित्य संमेलन नऊ फेब्रुवारीपासून

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्यावतीने तीन दिवसांचे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात नऊ फेब्रुवारीला संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. कवी इंद्रजित भालेराव यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष, तर सुनंदा पवार या संमेलनाच्या निमंत्रक आहेत. या संमेलनामध्ये बालकथाकथन, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल कविसंमेलन, विज्ञानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन चळवळीवर परिसंवाद, लेखक-कवी तुमच्या भेटीला, विविध गुणदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथप्रदर्शन आणि विविध कार्यशाळांचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘अमरेंद्र-भास्कर बालकुमार साहित्य संस्थे’चे अध्यक्ष राजन लाखे आणि ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’चे व्यवस्थापक धनंजय ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.