Tue, March 28, 2023

‘महाराष्ट्राने जातीनिहाय जनगणना करावी’
‘महाराष्ट्राने जातीनिहाय जनगणना करावी’
Published on : 28 January 2023, 1:13 am
पुणे, ता. २८ : बिहार, राजस्थान, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने केली. जनगणना हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. मात्र, केंद्र सरकारने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बिहारप्रमाणे जातीनिहाय जनगणना करावी, असा विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्याची अंमलबजावणी शिंदे-फडणवीस यांनी करावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केली. महासंघाचे विश्वस्त विठ्ठल सातव आणि शहराध्यक्ष कुंडलिक गायकवाड या वेळी उपस्थित होते.