गांधींना बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरू ः अरुण खोरे धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२ दोन पुस्तकांचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधींना बदनाम करण्याचे कट 
कारस्थान सुरू ः अरुण खोरे

धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२ दोन पुस्तकांचे प्रकाशन
गांधींना बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरू ः अरुण खोरे धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२ दोन पुस्तकांचे प्रकाशन

गांधींना बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरू ः अरुण खोरे धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२ दोन पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः ‘‘महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचे कट कारस्थाने सुरू आहेत. गांधीजी, नेहरूजी हिंदू होते, की मुसलमान हे महत्त्वाचे नाही, ते श्रेष्ठ भारतीय, श्रेष्ठ मानव आहेत, हे महत्त्वाचे आहे. गांधी यांना मोठया प्रमाणात स्वीकारले गेले आहे. हा विचारांचा ठसा अमीट आहे. हा वारसा पुढे नेला पाहिजे. काँग्रेसची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे कॉंग्रेसने निष्प्रभ होऊन चालणार नाही,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि गांधी विचारांचे अभ्यासक अरुण खोरे यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सामुदायिक प्रार्थना आणि खोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी महात्मा गांधी लिखित ‘धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांनी प्रश्न सोडविण्याचा वेगळा मार्ग जगाला दाखवला म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व जगाला वाटते. त्यांचा विचार संपणार नाही, ते ऑक्सिजनप्रमाणे अवतीभवती आहेत. महात्मा गांधी यांना मारण्याचे सहा प्रयत्न झाले. पृथ्वी नष्ट करण्याच्या प्रयत्नांना गांधीविचार हे उत्तर आहे. हाच संदेश महात्मा गांधी यांच्या धर्मविचार पुस्तकात सांगितला आहे. आता महात्मा गांधी कोणत्याही पक्षातून निर्माण होणार नाही, मात्र सामान्य माणसातूनच पुढे येईल’’.
डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड, आदित्य आरेकर, श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.