धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध
काँग्रेस पक्षाचे आंदोलन
धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे आंदोलन

धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सोनाली मारणे यांनी केली.
संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसच्या सचिव मारणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन झाले. ‘‘भोंदू बाबापासून लोकांनी दूर राहावे, अशी शिकवण संत तुकाराम महाराजांनी दिली. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीमध्ये विठ्ठल भक्तीवरून कोणतेही मतभेद नव्हते. असे असताना संत तुकाराम आणि त्यांच्या अर्धांगिनी यांच्याबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचे डोके ठिकाणावर आहे का?’’, असा सवाल मारणे यांनी केला.
माजी महापौर कमल व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, सेवा दलाचे अध्यक्ष प्रकाश पवार, वाल्मीक जगताप, विकास देशपांडे, द. स. पोळेकर, नाना करपे यांच्यासह इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.