अऱ्हाना यांच्या घरी, कार्यालयावर छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अऱ्हाना यांच्या घरी, कार्यालयावर छापे
अऱ्हाना यांच्या घरी, कार्यालयावर छापे

अऱ्हाना यांच्या घरी, कार्यालयावर छापे

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॅम्पमधील रोझरी शिक्षण संस्थेचे संचालक विनय अऱ्हाना यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. सेवा विकास सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
सेवा विकास बँकेच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने शोध मोहीम हाती घेतली आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली होती. मूलचंदानी यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकिंग नियमांचे उल्लंघन करून रोझरी शिक्षण संस्थेच्या विनय अरान्हा यांना कर्ज मंजूर केले. अरान्हा यांनी बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचा संशय आहे. याप्रकरणी अरान्हा आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या आधारे शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने अऱ्हाना यांच्या कॅम्पमधील घरी आणि रोझरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. तसेच, अऱ्हाना यांच्याकडे चौकशी केल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती ईडीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे जारी केली आहे. दरम्यान, या संदर्भात अऱ्हाना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
-------