कोयता गँगमधील मुले बालनिरीक्षणगृहातून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयता गँगमधील मुले 
बालनिरीक्षणगृहातून पसार
कोयता गँगमधील मुले बालनिरीक्षणगृहातून पसार

कोयता गँगमधील मुले बालनिरीक्षणगृहातून पसार

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कोयता गॅंगमधील सात अल्पवयीन मुलांनी येरवड्यातील बालनिरीक्षणगृहाच्या संरक्षक भिंतीला शिडी लावून धूम ठोकली. ही घटना सोमवारी दुपारी पावणेबारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली. ही सर्व मुले पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून, १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत.
शहरात नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अल्पवयीन असल्यामुळे त्यांना येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या मुलांना वेगवेगळ्या सत्रासाठी बाहेर काढले होते. त्यावेळी बालनिरीक्षणगृहाच्या पश्चिम बाजूच्या संरक्षक भिंतीला शिडी लावून या मुलांनी पलायन केले. त्यांच्यासोबत निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आलेला सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भेकराईनगर, हडपसर) हा आरोपीही पसार झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या संदर्भात बालनिरीक्षणगृहाचे काळजीवाहक संतोष किसन कुंभार (वय ४६, रा. चऱ्होली फाटा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मुले कोठे पसार झाली, तसेच या मुलांना पळून जाण्यास कोण मदत केली, याचा पोलिस तपास करीत आहेत.