
पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी केतन कोठावळे
पुणे, ता. ३१ : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजय मिळविला. अॅड. कोठावळे यांना दोन हजार ७२८ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अॅड. राहुल दिंडोकर यांना एक हजार ४९८ मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत अॅड. विश्वजीत पाटील यांना तीन हजार १० तर अॅड. जयश्री चौधरी-बीडकर दोन हजार २३४ मते मिळाली. सचिवपदाच्या दोन जागांसाठी अॅड. राहुल कदम यांना दोन हजार ७१९ व अॅड. गंधर्व कवडे यांना दोन हजार ४९१ मते मिळाली. तर, खजिनदारपदासाठी अॅड. समीर बेलदरे यांना दोन हजार ७९१ मते मिळाली. ऑडिटर म्हणून अॅड. अजय देवकर यांची तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. अमोल वडगणे, अॅड. प्रमोद नढे, अॅड. मयुरी कासट, अॅड. संजय खैरे, अॅड. रेश्मा चौधरी, अॅड. श्रद्धा जगताप, अॅड. राहुल प्रभुणे, अॅड. ऋषिकेश कोळपकर, अॅड. चंद्रसेन कुमकर आणि अॅड. सचिन माने यांची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमित गिरमे यांनी कामकाज पाहिले. तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून ॲड. दिलीप जगताप, ॲड. माधवी पोतदार, ॲड. शरद कुलकर्णी, ॲड. कांताराम नप्ते आणि ॲड. सिद्धेश्वर चौधरी यांनी कामकाज पाहिले.