सीओईपी झेस्ट महोत्सवचे ११ फेब्रुवारीपासून आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीओईपी झेस्ट महोत्सवचे
११ फेब्रुवारीपासून आयोजन
सीओईपी झेस्ट महोत्सवचे ११ फेब्रुवारीपासून आयोजन

सीओईपी झेस्ट महोत्सवचे ११ फेब्रुवारीपासून आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः ‘सीओईपी टेक’मधील झेस्ट क्रीडा महोत्सव ११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात होणार आहे. हे तीन दिवस सर्व क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहेत.
झेस्ट क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यार्थी करतात. सध्या या क्रीडा महोत्सवाची तयारी जोरदार पद्धतीने सुरू आहे. या
महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो,
बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, टेबल-टेनिस, कॅरम, बुद्धीबळ अशा १५ पेक्षा जास्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले आहे. या सर्व क्रीडा स्पर्धा ‘सीओईपी टेक’ विद्यापीठाच्या मैदानावर होतील. या सर्व स्पर्धांसाठी
ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी https://www.coepzest.org/events/ या संकेस्थळावर सुरू झाली आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी त्या स्पर्धेच्या प्रकारानुसार नोंदणी शुल्क आहे. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.