Thur, March 23, 2023

आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण
आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण
Published on : 4 February 2023, 12:27 pm
पुणे, ता. ४ : महर्षी धोंडो केशव कर्वे संस्थापित पुणे गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद एच्.एच्.सी.पी. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स हुजूरपागा लक्ष्मी रोड यांनी भूषविले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय कबड्डी खेळाडू धनश्री वैद्य-वाघ, अभिनेत्री दीप्ती लेले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शालिनी पाटील, सचिव रेखा पळशीकर, असोसिएशनच्या कार्यवाह विनिता फलटणे, जयश्री बापट, क्रीडाध्यक्ष सुनीता सोनवणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता सोनवणे, शैलजा गोडांबे यांनी केले. तर श्रद्धा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.