आम आदमी पक्षातर्फे पाणी परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम आदमी पक्षातर्फे पाणी परिषद
आम आदमी पक्षातर्फे पाणी परिषद

आम आदमी पक्षातर्फे पाणी परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः ‘‘सर्वसामान्य नागरिकांचा पाणी, रस्ते, स्वच्छता हे प्रश्न सोडवणारा योग्य उमेदवार, पक्ष आपण निवडून दिला नाही ही आपली समस्या आहे,’’ असे आम आदमी पार्टीचे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी सांगितले.
पाणी प्रश्न संदर्भात धायरी येथे आम आदमी पक्षातर्फे पाणी परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य संयोजक रंगा राजुरे, राज्य संघटक विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, शहर समन्वयक अभिजित मोरे, पाणी परिषद आयोजक धनंजय बेनकर, आप युवा राज्य संघटक संदीप सोनवणे, शहर संघटक एकनाथ ढोले, शहर संपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, आप मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे, जल हक्क आंदोलन समिती अध्यक्ष आबासाहेब कांबळे, किशोर मुजुमदार, प्रीतम कोंढाळकर, राजाभाऊ बेनकर, राहुल बेनकर, संदीप बेनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने जलहक्क आंदोलन समितीच्या पाणीपुरवठा प्रश्न बाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्या संदर्भात माहिती देण्यात आली. शहरात असलेली अपूर्ण पाणीपुरवठ्याची कामे, चाळीस टक्के पाणी गळतीच्या नावाखाली होत असलेली पाणी चोरी, तसेच समाविष्ट गावांना दररोज पाणी मिळत नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.