Sun, April 2, 2023

कॅम्प येथून तरूण बेपत्ता
कॅम्प येथून तरूण बेपत्ता
Published on : 7 February 2023, 9:11 am
पुणे, ता. ७ : चिंचवड येथील रहिवासी संतोष छगन खवले (वय ४२) हे कॅम्प येथून तीन जानेवारी रोजी बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या पत्नीने लष्कर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. खवले हे रंगाने सावळे असून त्यांची उंची पाच फूट सहा इंच आहे. त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅंट घातलेली आहे. तर पायात निळ्या रंगाचा बूट आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास ८०१०९६४४२३, ९६०४५३११११ या क्रमांकावर किंवा लष्कर पोलिसांत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.