फिरोदिया करंडकाला शनिवारपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरोदिया करंडकाला शनिवारपासून प्रारंभ
फिरोदिया करंडकाला शनिवारपासून प्रारंभ

फिरोदिया करंडकाला शनिवारपासून प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला आदी कलांचा मनोहारी संगम पाहायला मिळणाऱ्या ‘फिरोदिया करंडक’ या आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेला येत्या शनिवारपासून (ता. ११) प्रारंभ होणार आहे. सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे पार पडेल. स्पर्धेचे संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष आहे.

यंदाच्या स्पर्धेत एकूण ५० महाविद्यालये सहभागी झाले होते. पूर्व प्राथमिक फेरी व मागील वर्षीचे निकाल याद्वारे त्यातील तीस संघांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दुपारी १.३० वाजता आणि सायंकाळी ६ वाजता, अशा दोन सत्रांमध्ये प्राथमिक फेरी रंगेल. यातून निवडलेल्या संघांमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला अंतिम फेरी पार पडेल. ‘वन अवर सिनेमा ऑन स्टेज’ अर्थात ‘रंगमंचावर एक तासाचा चित्रपट’ असे या स्पर्धेचे आगळेवेगळे स्वरूप असते. यामध्ये स्पर्धक संघांनी एक तासाच्या कालावधीचा नावीन्यपूर्ण कलाविष्कार सादर करणे अपेक्षित असते. यामध्ये नाटक, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, पपेट शो, ॲनिमेशन अशा विविध प्रकारच्या कलांचा आविष्कार एकाचवेळी पाहायला मिळतो.

फिरोदिया करंडक स्पर्धेचे पुढील वर्ष पन्नासावे अर्थाच सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल. त्या अनुषंगाने अनेक नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. सदर उपक्रमांची रूपरेषा स्पर्धे दरम्यान मांडण्यात येणार आहे.
-अजिंक्य कुलकर्ण, संयोजक