इस्कॉनमध्ये भव्य देव्हाऱ्याचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्कॉनमध्ये भव्य देव्हाऱ्याचे अनावरण
इस्कॉनमध्ये भव्य देव्हाऱ्याचे अनावरण

इस्कॉनमध्ये भव्य देव्हाऱ्याचे अनावरण

sakal_logo
By

इस्कॉनमध्ये भव्य देव्हाऱ्याचे अनावरण

पुणे, ता. ६ ः कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोन्याची झळाळी असलेल्या एक कोटी रुपयांच्या भव्य देव्हाऱ्याचे नुकतेच अनावरण झाले. भगवान राधा-कृष्ण, भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा तसेच हरिनाम आंदोलनाचे प्रणेते चैतन्य महाप्रभू व नित्यानंद महाप्रभू यांच्या मूर्ती या देव्हाऱ्यामध्ये विराजमान झाल्या.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ-इस्कॉनच्या पुणे मंदिरातर्फे श्री श्री राधा वृंदावनचंद्र मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पाच दिवसीय उत्सवाचा समारोप इस्कॉनमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात झाला. यावेळी प. पू. लोकनाथ स्वामी, चंद्रमौली स्वामी महाराज, नरसिंह आनंद प्रभू, गौरांग प्रभू आदी उपस्थित होते. या उत्सवात श्री राधा-कृष्णांचे नौका विहार उत्सव, अन्नकूट महोत्सव, महाप्रसाद, विविध प्रकारचे कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले, असे संजय भोसले, जर्नादन चितोडे यांनी सांगितले.