किमान तापमानात चढ-उतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान तापमानात चढ-उतार
किमान तापमानात चढ-उतार

किमान तापमानात चढ-उतार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमानात चढ-उताराची स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून १० अंशांच्या दरम्यान असलेल्या किमान तापमानात आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पुढील आठवडाभर किमान तापमानात चढ-उतार अशीच पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तला आहे.
सोमवारी (ता. ६) शहरात ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पारा १३ अंशांच्या पुढे नोंदले गेले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होत आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. १२) शहर आणि परिसरात तापमानातील चढ-उतार असेच कायम राहणार आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारठा कायम असून किमान तापमानाचा पारा पुन्‍हा चढू लागला आहे. सोमवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळे येथे नऊ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या खाली कायम होते. राज्याच्या बहुतांश ठिकाणी किमान तापमान ११ अंशांच्या वर नोंदले गेले. दरम्यान राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उत्तर भारतात बुधवारपासून (ता. ८) नवीन पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये ही थंडी कमी होत असून याचा परिणाम राज्यावरही दिसून येत आहे.