Fri, March 31, 2023

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे तिळगूळ समारंभ
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे तिळगूळ समारंभ
Published on : 7 February 2023, 9:08 am
पुणे, ता. ७ ः कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे तिळगूळ वाटप समारंभ नुकताच उत्साहात साजरा झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शोभा नाखरे यांनी ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा स्त्री कर्तृत्वाच्या कार्याचा वेध घेणारा कार्यक्रम सादर केला. तसेच, वयाची ७५ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचे औक्षण व सत्कार, ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवणारे बाळकृष्ण सप्रे यांचा सत्कार आणि महिलांसाठी हळदीकुंकू उपक्रम पार पडले. याप्रसंगी मुक्ता चांदोरकर, गणेश गुर्जर, बळवंत भाटवडेकर, दीपक भडकमकर, गिरीश शेवडे, अपर्णा पुरोहित आदी उपस्थित होते. माधुरी करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले.