रिलायन्सतर्फे गॅलेक्सी एस २३ सिरीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्सतर्फे गॅलेक्सी एस २३ सिरीज
रिलायन्सतर्फे गॅलेक्सी एस २३ सिरीज

रिलायन्सतर्फे गॅलेक्सी एस २३ सिरीज

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : रिलायन्स डिजिटल या देशातील मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने सॅमसंग स्मार्टफोन्सची बहुचर्चित गॅलेक्सी एस २३ सिरीज (गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा, गॅलेक्सी एस २३+ आणि गॅलेक्सी एस २३) नुकतीच लाँच केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रामध्ये २०० एमपी कॅमेरा, १०० एक्स झूम आणि सुधारित नाईटोग्राफी कॅपेबिलिटीज आहेत. या प्रसंगी रिलायन्स डिजिटलचे प्रमुख अधिकारी ब्रायन बडे म्हणाले, ‘‘रिलायन्स डिजिटल आणि सॅमसंगची भागीदारी मोलाची आणि स्वागत करण्यासारखी आहे. देशातील ग्राहकांना गॅलेक्सी एस २३ सिरीजसारखं आधुनिक तंत्रज्ञान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’’
डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले, अल्ट्रा-फास्ट मोबाईल ग्राफिक्स आणि गेम मोडमध्ये टच सॅम्पलिंग रेटमुळे गेमर्सनेही आनंद लुटला. आपली टेक्नॉलॉजी से रिश्ता जोडो ही मोहीम खरी करताना रिलायन्स डिजिटलने गॅलेक्सी एस २३ सिरीजच्या प्री-बुकिंगची सुरुवात केली. गॅलेक्सी एस २३ खरेदी करणाऱ्यांना तीन ते पाच हजारांपर्यंतच्या ॲक्सेसरीज मिळणार असून सॅमसंग अपग्रेडवर आठ हजारांपर्यंत सुविधा आणि काही बॅंकांच्या क्रेडीट कार्डवर १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.