कोंढवा परिसरात बेकायदा गुटखा विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढवा परिसरात बेकायदा गुटखा विक्री
कोंढवा परिसरात बेकायदा गुटखा विक्री

कोंढवा परिसरात बेकायदा गुटखा विक्री

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : कोंढवा पोलिसांनी परिसरात बेकायदा गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्या दोघांना अटक केली. एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पावणेसहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
जीतलाल श्रीरामनंदन यादव (वय ३९, रा. भोईटे चाळ, कोंढवा खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश) व अभिजित शिवलिंग कटके (वय २५, रा. येवलेवाडी, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा गुटखा विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कोंढवा खुर्द येथील लोणकर नगर, एनआयबीएम रस्ता परिसरात तंबाखूजन्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलिस नाईक जोतिबा पवार आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी पप्पू पान शॉप येथे छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख ७३ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी गुड्डू खान (रा. कोंढवा बुद्रूक) याच्याकडून गुटखा विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून कोंढवा पोलिस संशयित गुड्डू खान याचा शोध घेत आहेत.