
संगणक टंकलेखन परीक्षेची प्रवेशपत्रे होणार उपलब्ध
पुणे, ता. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) आणि स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स ॲण्ड स्टुडंट्स (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) या दोन्ही परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने २८५ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे उपलब्ध करून दिली आहेत.
संबंधित संगणक टंकलेखन संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून परीक्षार्थींना वितरित करण्याची व्यवस्था करावी, सर्व परीक्षार्थींनी त्यांची ऑनलाइन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी घ्यावी. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करून दिली जाणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे स्पष्ट केले आहे.