वडगाव शेरीतील टीपी स्कीमला मान्यता

वडगाव शेरीतील टीपी स्कीमला मान्यता

Published on

पुणे, ता. ८ ः वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी जागामालक जागा देत नसल्याने व त्याचा परिणाम या परिसरावर होत असल्याने अखेर या ठिकाणी नगररचना परियोजना (टीपी स्कीम) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजुरी दिली.
पुणे महापालिका हद्दीत वडगाव शेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली. तेव्हापासून वडगाव शेरीतील जागामालक रस्त्यासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादन करण्यास तयार होत नाहीत. या गावामधील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे आवश्यक असल्याने वडगाव शेरीतील सर्व्हे क्रमांक १७ /१ /३ब , १०/४ , ११/ १ /२ /३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टीपी स्कीम करावी, अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला. त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.