विजय शेंडगे यांचा सत्कार

विजय शेंडगे यांचा सत्कार

Published on

पुणे, ता. ८ ः महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर, मंगळवेढा शाखेतर्फे विजय शेंडगे यांचा साहित्यिक वाटचालीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शेंडगे यांचा ‘अमृतस्पर्श’ हा कथासंग्रह आणि ‘पिपाणी’ हे ललित पुस्तक शाखेला भेट देण्यात आले. यानिमित्ताने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी प्रकाश जडे, दत्ता सरगर यांच्या कवितांना रसिकांनी विशेष दाद दिली. सत्काराला उत्तर देताना शेंडगे म्हणाले, ‘‘पुरस्कार हे व्यक्तिसापेक्ष असू शकतात. त्यामुळे पुरस्कार मिळवणे, हे साहित्यिकांचे ध्येय असता कामा नये. परंतु, उत्तम साहित्याला पुरस्काराने गौरविणे हे साहित्यसंस्थांचे ध्येय असायला हवे.’’ बालाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिवाजी सलगर, रेखा जडे, पोपट महामूरे, सचिन गालफाडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.