surya namaskar
surya namaskarsakal

Surya Namaskar : राज्यभर उद्या सामूहिक सूर्यनमस्कार

वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते.
Summary

वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते.

पुणे : समाजातील सर्व वयोगटासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त असून आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीवर जाणे, उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमविणे आणि काही काळ आराम करण्याच्या पलीकडे काही करत नसल्याचे पाहायला मिळते.

वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते. यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने शनिवारी (ता. ११) राज्यात एकाच दिवशी २००० हून अधिक शाळांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच मुलांसाठी ‘सकाळ’ स्वास्थम हे सदर सुरू करत आहे.

भावी पिढीला आरोग्याचे महत्त्व कळावे हा यामागचा उद्देश आहे. यासोबतच महाराष्ट्र व गोव्यातील सर्व वयोगटाच्या वाचकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा २०२३ योजना सुरू करीत आहोत.

याद्वारे वाचकांचे आरोग्य ज्ञान वाढवून त्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी या योजनेला सुरुवात होऊन २५ मे २०२३ ही योजनेची शेवटची तारीख राहील. एकूण १०० दिवसांची ही योजना राहील. ही योजना फक्त ऑफलाइन पद्धतीने राहील.

हे लक्षात ठेवा
- ऑफलाइन सहभागासाठी नेहमीप्रमाणे सकाळ अंकातील सदर वाचा, प्रश्नांच्या उत्तराचे कुपन चिकटवा व बक्षिसे जिंका ही कार्यपद्धती राहील.
- यासाठी अंकात स्वास्थम विषयावर आधारित याच नावाचे एक सदर प्रसिद्ध केले जाईल.
- एकूण १०० पैकी ९० बरोबर उत्तरांची कुपन्स बक्षिसासाठी ग्राह्य धरली जातील.

आकर्षक बक्षीसे
पहिले बक्षीस १० ग्रॅम सोन्याचे मेडल -११, (दुसरे) स्मार्ट वॉच -१००, (तिसरे) सायकल-१००, (चौथे) विमान प्रवास तिकीट - १००, (पाचवे) स्पोर्ट शूज किंवा हेल्मेट - १०००, (सहावे) आरोग्य उत्पादने - १०००, (सातवे) वॉटर बॉटल्स - १०००, (आठवे) उत्तेजनार्थ - कोलगेट गिफ्ट पॅक - ४०,००० अशा सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त रकमेच्या ४३,००० पेक्षा जास्त बक्षिसांचा समावेश केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com