जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे, ता. ९ : कोळेवाडी येथे दोन एकर जमीन संगनमत करून आधारकार्ड व पॅनकार्डचा वापर करून बोगस व्यक्ती उभी करून जमीन बळकावल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन जाचक, प्रशांत गावडे, पंकज भुमकर, संतोष शेट्टी, शैलेश लांडे, विशाल कांबळे, तसेच आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अत्तार गुलाम हुसेन (वय ७५, रा. सेंट्रल पार्क, सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी १९८६ मध्ये ही जमीन खरेदी केली होती. जमीन हडपण्याचा प्रकार १७ जून २०२२ रोजी घडला. त्याचा बनावट दस्त फोटो जिंको कार्यालयाजवळील सहदुय्यम निबंधक कार्यालयात केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com