दगडफेकीच्या भीतीने 
‘वंदे भारत’साठी खबरदारी

दगडफेकीच्या भीतीने ‘वंदे भारत’साठी खबरदारी

Published on

पुणे, ता. ९ ः मुंबई- पुणे- सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे शुक्रवारी उद्‍घाटन होत आहे. मुंबईहून पुण्याला येताना व पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून आरपीएफची अतिरिक्त तुकडी पुणे स्थानकावर दाखल झाली आहे. यात सुमारे ६० जवान असून त्यांना विविध रेल्वे स्थानकासह संवेदनशील स्थानकाच्या जवळील ट्रॅकशेजारी नियुक्त केले जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक होऊ नये, म्हणून रेल्वेच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. नाशिकहून ६० जवान पुण्यात दाखल झाल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.