
‘एफआयआयटी जेईई’च्या सात विद्यार्थ्यांना १०० गुण
पुणे, ता. ९ ः ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे आयोजित संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई मुख्य परीक्षा, जानेवारी सेशन) निकाल जाहीर झाला असून, भारतातील इंजिनिअरिंग ट्रेनिंगमधील प्रमुख संस्था ‘एफआयआयटीजेईई’च्या एकूण ७ विद्यार्थ्यांनी शंभर गुण मिळविले आहेत.
‘एफआयआयटीजेईई’च्या अमोघ जालान, निपुण गोयल, सोहम दास, अभिजित मजिते, गुलशन कुमार, रिषी कालरा आणि मयांक सोनी यांना शंभर गुण मिळाले, तर एकूण २४ जणांनी ९९.९९ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. ‘एफआयआयटीजेईई’च्या पुणे केंद्रातील १० विद्यार्थ्यांना ९९पेक्षा अधिक गुण मिळाले. यासंदर्भात पुणे केंद्राचे प्रमुख राजेश कर्ण म्हणाले, ‘‘ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो. आता आमचे ध्येय जेईईमध्ये (ॲडव्हान्स) चांगले गुण मिळविण्याचे आहे. आमची शिकवण्याची वेगळी पद्धत आणि विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम काढून घेण्याच्या हातोटीचे हे यश आहे.’’ या परीक्षेचा दुसरे सत्र ६ ते १२ एप्रिलदरम्यान होईल.