Mon, March 20, 2023

एमसी स्टॅनची ‘बिग बॉस’मध्ये बाजी
एमसी स्टॅनची ‘बिग बॉस’मध्ये बाजी
Published on : 12 February 2023, 7:30 am
पुणे, ता. १२ : एमसी स्टॅन या पुण्यातील ताडीवाला रस्ता झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलाने ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता अमरावतीचा शिव ठाकरे हा फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खान याने रविवारी रात्री एका दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.