‘एआयसीटीई’च्या उपाध्यक्षपदी डॉ. अभय जेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एआयसीटीई’च्या उपाध्यक्षपदी डॉ. अभय जेरे
‘एआयसीटीई’च्या उपाध्यक्षपदी डॉ. अभय जेरे

‘एआयसीटीई’च्या उपाध्यक्षपदी डॉ. अभय जेरे

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) उपाध्यक्षपदी डॉ. अभय जेरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे देशाचे नवोन्मेष अधिकारी म्हणून (चीफ इनोव्हेशन ऑफिसर) म्हणून जबाबदारी होती.
देशातील नवोन्मेष आणि नवकल्पकतेला डॉ. जेरे यांच्या नेतृत्वात नवदिशा प्राप्त झाली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची एआयसीटीईच्या उपाध्यक्षपदी निवड होणे निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ‘सकाळ’शी बोलताना डॉ. जेरे म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता अधिक वाढविण्याला आमचे प्रथम प्राधान्य आहे. महाविद्यालयांच्या मान्यतेबरोबरच उच्चशिक्षणातील नियमन ‘लाइट बट टाइट’ करण्याचा आमचा मानस आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एआयसीटीई आवश्यक ते सर्व प्रयत्न कसोशीने करेल.’’ एआयसीटीईचे माजी अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांच्यानंतर डॉ. जेरे यांच्या रूपाने एका मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती एआयसीटीमध्ये मोठ्या पदावर झाली आहे. सध्या एआयसीटीईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रा. टी. एस. सीथारामन यांच्याकडे आहे.

फोटो ः PNE23T24511